नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा. नगरपंचायतीमधील समस्या तत्काळ सोडवाव्यात आदी विविध मागण्यांचे निवेदन होते. ते स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या नेतृत्वात तहसिलदार यांच्या मार्फत पालकमंत्र्यांना देण्यात आले.
यामध्ये मारेगाव तालुका ओला दुष्काळ घोषित करा. तसेच परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या कपाशी, सोयाबीन पिकांचे सर्वे करून तत्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत करा. खुल्या जागेवर असलेल्या कचरा डेपोमुळे प्लास्टिक उडून परिसरातील शेतकऱ्याचा शेतात जाऊन नुकसान होते.
त्यावर त्वरित कंपाउंड करा. एमआयडीसी त्वरित चालू करून तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्या. शहर विकासनिधीतून शहरात झालेल्या 3 कोटी रुपयांच्या कामाची चौकशी करा. आदी विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
येत्या सात दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा स्वराज्य शेतकरी युवा संघटनेने दिला आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार, सचिन पचारे, विशाल किन्हेकार, विजय मेश्राम, राजू मांदाडे,
तुकाराम वासाडे, सोमेश्वर गेडेकर,अनिल राऊत, गोपाळ खामनकर, राजू खडसे, राजू गौरकार, नितीन कडू, अभय गवळी, अतुल देवगडे, शेषराव मडावी, सूरज गमे, प्रवीण काळे, विकास राऊत यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)