शिरपूर शेत शिवारातील कपाशीवर बोंडअळीचा हल्ला

नुकसान भरपाई देण्याची शेतक-यांची मागणी

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर येथे कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला आहे. शिरपूर परिसरातील शिरपूर, सुरजापूर, निपाणी-पिंपरी या शेत शिवारात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे पिक चांगले आले आहे. कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. मात्र कापसाच्या बोंडावर गुलाबी बोंडअळीने हल्ला केला आहे. हा हल्ला इतका मोठा आहे की त्याने बोंड गळून पडत आहे. गळून पडलेल्या बोंडाची पाहणी केली असता त्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बोंडअळीच्या हल्ल्यामुळे शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

याविषयी संबधीत अधिकाऱ्यांनी मार्फत पाहणी करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी प्रमोद मंदे, मिलींद पाचभाई, सुनील बर्डे, अमोल बोंडे, ओंकार काकडे, सुनीता बोडें इत्यादी शेतकऱ्यांनी केली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.