पाण्यामुळेच घेतला विषयाने पेट

वृद्ध महिलेस मारहाण: राजूर येथील घटना

0

विवेक तोटेवार, वणी: राजूर येथे राहणाऱ्या एका महिलेस तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने व तिच्या पतीने मारहाण केली. ही घटना शनिवार 24 ऑक्टोबर सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार वृद्ध महिलेने वणी पोलिसात दिली आहे. तिच्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पाण्यामुळेच या विषयाने पेट घेतला.

Podar School 2025

महिला राजूर येथे राहते. तिच्या घराशेजारी अस्मिता प्राण दास (32) ही आपल्या कुटूंबासोबत राहते. कमल व अस्मिता यांच्या कुटुंबाचा रस्त्यावरून गेल्या 23 वर्षांपासून वाद आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता कमल ही कपडे धूत असताना त्याचे पाणी हे अस्मिता हिच्या अंगावर उडाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेच कारण घेऊन अस्मिता हिने कमलला मारहाण केली. या मारहाणीत अस्मिताचे पतीही आले. त्यानेही या वृद्ध महिलेस मारहाण केली. याबाबत तक्रार कमल ह्यांनी वणी पोलिसात दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अस्मिता हिच्याविरुद्ध कलम 323, 504, 506 नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.