9 लाखांचा आरओ प्लान्ट चालतो जुगाडावर

जामनी येथील खनिज विकास निधीतील प्लांटचे काम निकृष्ट

0

सुशील ओझा, झरी: जनतेला शुद्ध व थंड मिळावे याकरिता शासनाकडून बहुतांश ग्रामपंचायतमध्ये आरओ प्लान्ट लावले आहे. खनिज विकास निधी व 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून हा खर्च करण्यात आला. यातील 90 टक्के आरओ प्लान्ट बंद अवस्थेत पडलेले आहे. प्लांटचे बांधकाम, प्लान्टसाठी वापरण्यात आलेली साहित्य नित्कृष्ट व शेडचे बांधकाम ही निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे.

तालुक्यातील जामनी येथे खनिज विकास निधीतून 9 लाखाचा आरोप्लान्ट एक वर्षांपूर्वी लावण्यात आला. परंतु निकृष्ट बांधकाम केल्याने प्लॉन्टला लावण्यात आलेले पाईप व पाण्याच्या टाकीला काठी, लाकडी पाट्या व फरसीचे तुकडेच्या आधाराचे जुगाड लावून चालवावे लागत आहे. जुगडाचे काठी किंवा फरशी पडले की पाणीपुरवठा बंद पडतो. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

सदर आरोप्लान्ट दिनांक 16 सप्टेंबर रोजी मंजूर झाले असून याचे काम 25 जानेवारीला पूर्ण झाले. एक वर्षाच्या आत आरोप्लान्टचे बांधकाम खचायला लागले आहे. जामनी येथील पाण्याच्या टाकीचा ओटा फुटल्याने पाण्याच्या टाकी घसरत आहे. या आरोप्लान्ट मध्येही मोठा भ्रष्टचार झाल्याचा आरोप गावकरी करीत आहे.

खनिजविकास निधीतील आरोप्लान्टचे काम बाहेरील ठेकेदारांच्या नावावर घेऊन तालुक्यातीलच राजकीय लोकांनी नित्कृष्ट दर्जेचे काम मोठ्या प्रमाणात करून लाखो रुपयांची माया जमविल्याची चर्चाही आहे. आहे. 3 लाखाचा आरोप्लान्ट साडे सात ते नऊ लाखात बसविले तेही हलक्या कंपनीचे साहित्य लावून. परिणामी एका वर्षाच्या आत बहुतांश आरोप्लान्ट बंद पडले आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.