आणि उभ्या पिकांवर शेतकऱ्याला फिरवावे लागले ट्रॅक्टर
अस्मानी, सुलतानी संकटांनी ढळला शेतकऱ्याचा संयम
नागेश रायपुरे, मारेगाव: परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले. एका शेतकऱ्याने चक्क 5 एकर सोयाबीनच्या उभ्या पिकांवर अखेर ट्रॅक्टर फिरवला. तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील शेतकरी संभाजी डोमाजी बेंडे हा निर्णय घेऊन कृती केली.
तालुक्यात परतीच्या पावसाने कापूस सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले. तालुक्यातील बोरी (गदाजी)येथील संभाजी बेंडे यांची 5 एकरावर सोयाबीन पीक पेरले होते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यात पडलेल्या परतीच्या सततच्या जोरदार पावसाने सोयाबीन पिकाला कोंब फुटून पूर्ण नुकसान झाले.
सोयाबीनचे पूर्ण नुकसान झाल्याने संतापाच्या भरात या शेतकऱ्याने अवघ्या 5 एकरावर पेरलेल्या सोयाबीनच्या उभ्या पिकावर आज ट्रॅक्टर फिरवले. सोयाबीन पिकाच्या परतीच्या पावसाने नुकसान केल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या या कृतीची पंचक्रोशीत चर्चा होती.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)