मारेगावची स्टेट बँक गेल्या पाच दिवसांपासून बंद

लिंक नसल्याचं कारण, ग्राहक त्रस्त

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील भारतीय स्टेट बँक लिंक अभावी बंद असल्याने ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहे. मुख्य मार्गावर हि स्टेट बँक आहे, हजारो ग्राहकाचे खाते ह्या बँकेत असल्याने गेल्या चारपाच दिवसांपासुन लिंक अभावी व्यवहार ठप्प पडले असल्याने तोंडावर आलेला दिवाळीच्या सणात तोंडावर खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सध्या सणा उत्सवाचा काळ असल्याने लोकांना पैशाची गरज भासत आहे. मात्र  लिंकच्या कारणावरून ग्राहकाची कोंडी होत आहे. संबंधित बँक प्रशासनाने ग्राहकाची व्यवहारा  संबंधी सुविधा पुरवावी असे ग्राहकाचे म्हणने आहे.

शेजारीच असलेल्या सेन्ट्रल बँकेत लिंक चालु आहे. ग्राहकास सेवा देणे हे बँकेचे कर्तव्य आहे, मात्र सेवा देण्यात स्टेट बँक अपयशी ठरत आहे. सध्या तरी लिंक कधी सुरु होईल याकडे ग्राहकाचे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.