चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ७१% मतदान

अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर पोलीसांचा चोख बंदोबस्त

0
रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले होते. शनिवारी पार पडलेल्या मतदानात १९ जागांसाठी ७०.६०% मतदान झाले. यावेळी चिखलगाव मतदान केंद्र अतिसंवेदनशील असल्याने पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
तालुक्यातील १९ ग्रामपंचायत च्या निवडणुका शनिवारी पार पडल्या.  यात चिखलगाव ग्रामपंचायत मधील वार्ड क्र १ मध्ये ९०८ मातदारापैकी ७७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वॉर्ड क्र ३ मध्ये ६०८ पैकी ४९४, वॉर्ड क्र ३ मध्ये ८०६ पैकी ५१३, वार्ड क्र ४ मध्ये ८५८ पैकी ६७६, वॉर्ड क्र ५ मध्ये १०२२ पैकी ६६१ तर वॉर्ड क्र ६ मध्ये ११९३ पैकी  ६८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत सरासरी मतदानाची टक्केवारी ७०.६०% आहे. ५३८५ मतदारापैकी ३८०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
चिखलगाव मतदान केंद्र अतिसंवेदनशील मतदान केंद्र असल्याने वाढीव पोलीस कुमक बोलावण्यात आली होती. परिणामी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या अटीतटीच्या सामन्यात तिहेरी लढत बघायला मिळाली.  त्यामुळे मतदान विभाजन झाल्याचे दिसून आले. या मतदान विभाजन तसेच स्थानिक पकड असलेल्या सत्तारूढ गटाला नक्कीच फायदा होण्याची शक्यता आहे.
प्रथमच जनतेतून सरपंच निवडून द्यायचा असल्याने चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा सामना अधिकच रंगला असल्याचे आवर्जून बघायला मिळाले. आता सर्वांचे भवितव्य मशिनमध्ये बंद झाले आहे. या निवडणुकीचा निकाल सोमवारी सकाळी जाहीर होणार असल्याने उमेदवाराच्या काळजाचे ठोके वाढले आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.