उद्या राजूर बंद, शेतकरी आंदोलनाला समर्थन

बंदबाबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

0

जब्बार चीनी, वणी: शेतकरी विरोधी कायदे रद्द करा अशी मागणी करीत सध्या दिल्ली येथे शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान आंदोलकांतर्फे मंगळवारी 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक देत शेतकरी आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत आज सोमवार दिनांक 7 डिसेंबर रोजी राजूर कॉलरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यात एकमताने राजूर बंदचा निर्णय घेत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे ठरले.

Podar School 2025

केंद्र सरकारने नुकतेच तयार केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी देशभरातील दोनशे पक्षे अधिक शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी 8 डिसेंबरला देशव्यापी भारत बंद पुकारला आहे, ह्या भारत बंद ला देशभरातील सर्वच पक्षांनी व संघटनांनी समर्थन दिले आहे. त्याच अनुषंगाने राजूर कॉलरी येथेही 100 टक्के बंद यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

येथील ग्रामपंचायत सभागृहात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन एकमताने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन करीत भारत बंद निमित्त राजूर येथेही एक दिवसीय कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 8 डिसें च्या बंद यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी गावात फिरून सर्व लहान मोठे व्यावसायिकांना बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले.

या सर्वपक्षीय बैठकीला जि प सदस्य संघदीप भगत, माजी पं स सदस्य अशोकभाऊ वानखेडे, मारोती पाटील बलकी, महादेव तेडेवार, श्रीनिवास अंधेवार, मोहम्मद असलम, अश्फाक अली, कॉम्रेड कुमार मोहरमपुरी, साजिद खान, शंकर बोरगलवार, सुशील आडकीने, अजय बोरगलवार, बावणे आदी उपस्थित राहून व गावात जनजागृती करून शेतकऱ्यांचा भारत बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.

हे पण वाचा…

हे पण वाचा…

 

Leave A Reply

Your email address will not be published.