सुशील ओझा, झरी: वणीहून तेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणा-या तीन बोलेरो गाडी पोलिसांनी जप्त करत 13 बैलांची सुटका केली. या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 11 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त कऱण्यात आला. सुटका करण्यात आलेल्या बैलांची रवानगी कोंडवाड्यात करण्यात आली आहे.
रविवारी मुकुटबन ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांना फोनद्वारे तेलंगणात जनावरांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून राठोड यांनी 6 डिसेंबर रोजी गणेशपूर येथे नाकाबंदी केली. 4 वाजता दरम्यान वणीकडून येणाऱ्या तीन बोलेरो आल्या. गाडीच्या डाल्याची तपासणी केली असता या तीनही डाल्यात बैल भरून होते.
याबाबत पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर जनावरे कत्तली करिता तेलंगणात कत्तली करीता नेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बोलेरो गाडी (एमएच २९ व्हीई १६८७) (एमएच ३२ एजे ११९३) व (एमएच ३४ बीजी २८८४) ठाण्यात लावल्या. तीन बोलेरो गाडी किंमत सुमारे 9 लाख व 13 बैल किंमत सुमारे 2 लाख 60 हजार असा एकूण 11 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी मोहम्मद युनूस मोहम्मद नूर वय ३२ वर्ष रा. बेला (तेलंगणा), शंकर गजानन मिळविले वय २५ रा. डोर्ली, भोलाराम सुरेश पडोळे वय २५ रा. डोर्ली, गणेश गजानन धानोरकर वय २८ रा. अडेगाव, किशोर नारायण जींनावार वय ३०, विनोद विठ्ठल रासमवार दोघेही रा. मुकुटबन व राजू मधुकर झिलपे वय २५ रा. वणी यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर कलम 5 पशु सौरक्षण अधिनियम सह कलम ११ (१)(५)(घ) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम सह कलम ११९ मोटर वाहन अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. कत्तली करिता जाणाऱ्या १३ बैलाची सुटका करून मुकुटबन येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे.
सदर कार्यवाही ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड जमादार अशोक नैताम राम गडदे व प्रवीण ताडकोळवार यांनी केली. सदर कार्यवाही मुळे जनावर तस्कर करणाऱ्यात मोठी दहशत पसरली आहे.
हे पण वाचा…
हे पण वाचा…