लेखी आश्वासनानंतर नागरध्यक्षांचे उपोषण मागे

10 ते 15 दिवसात काम पूर्ण करण्याचे भूमी अभिलेख विभागाचे आश्वासन

0

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 7 डिसेंबर दुपारी 12 वाजतापासून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नगरसेवकांसोबत घरकुलाच्या जागेची मोजणी करून देण्याकरिता उपोषणाचे सुरू केले. परंतु सायंकाळी 5 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग यांच्याकडून लेखी आश्वासना मिळाल्यानंतर तारेंद्र बोर्डे यांनी उपोषण मागे घेतले.

नगर परिषदेने स्वमालकीच्या जागेवर 189 घरकुल दिले आहे. तसेच घरकूल योजनेंतर्गत 25 जून 2018 रोजी 1482 घरकूल मंजूर केले. परंतु पुढील कार्यात भूमी अभिलेख विभाग सहकार्य करीत नसल्याचा आरोप नगराध्यक्षांनी केला होता. भूमी अभिलेख विभागाच्या दुर्लक्षामुळे नगर परिषद घरकूल लाभार्थ्यांना लाभ देण्यास असमर्थ ठरत आहे असा आरोप करत आज आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह 21 जण तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. 

उपोषणाला बसल्यानंतर दुपारीच उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत आमदार यांची बैठक झाली. त्यानंतर भूमी अभिलेख उपअधीक्षक किशोर बहिरम यांनी उपोषणकर्त्याची भेट घेतली. त्यांच्यात संबंधीत विषयासंदर्भात बैठक झाली. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तहसीलदार शाम धनमने हे उपविभागीय अधिकारी व भूमी अभिलेख विभागाचे पत्र घेऊन उपोषण मंडपात आले.

या पत्रात भूमि अभिलेख विभागाने 10 ते 15 दिवसात पट्टे मोजणी करणार असल्याचे लिखित स्वरूपात आश्वासन दिले. त्यानंतर तहसीलदार शाम धनमने व भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या उपस्थितीत आमदारांच्या हस्ते नारळ पाणी देऊन नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे उपोषण सोडण्यात आले.

काय आहे हे प्रकरण?

2011च्या शासन निर्णयानुसार नझूलच्या जागेवर राहणाऱ्या लोकांना पट्टे द्यायचे असल्यास याची कारवाई नगर परिषद मुख्याधिकारी, भूमी अभिलेख कार्यालय व उपविभागीय अधिकारी यांच्या संयुक्त कारवाईने करून देऊ शकते. या प्रक्रियेत नगर परिषदेने लाभार्त्यांचे अर्ज मागविणे, डीपीआर मंजूर करणे हे काम केले आहे. पुढील काम म्हणजे जागेची मोजणी करणे, जागेचा 8 अ तयार करणे हे भूमी अभिलेख विभागाचे आहे. 

भूमी अभिलेख विभाग या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता. असा आरोप नगराध्यक्षांतर्फे करण्यात आला होता. याबाबत नगर परिषदने वारंवार भूमी अभिलेख विभागाशी पत्रव्यवहार केला. परंतु समर्पक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अखेर नगराध्यक्षांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते.

हेदेखील वाचा

शेतक-याने फिरवले उभ्या पिकावर ट्रॅक्टर

हेदेखील वाचा

ओबीसी मोर्चा नियोजनाबद्दल मुकुटबन येथे आढावा बैठक.

 

Leave A Reply

Your email address will not be published.