नारायण पाटील काकडे यांना वांजरी येथे श्रद्धांजली

विदर्भ राज्य आंदोलन समिती तथा शेतकरी संघटनेचे ते नेते होते

0

जब्बार चीनी, वणी: नारायण पाटील काकडे त्यांच्या वांजरी गावातील घरी बुधवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. दिनांक 6 डिसेंबरला यांचा अल्पशा आजाराने मुत्यु झाला होता. ते विदर्भ राज्य आंदोलन समिती तथा शेतकरी संघटनेचे खंदे कार्यकर्ते होते. त्यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान होते.

श्रद्धांजली कार्यक्रमात नारायण पाटील काकडे यांचे सहकारी प्रा.पाटील, रफिक रंगरेज, राहुल खारकर, बाळासाहेब राजूरकर, देवराव धांडे, सूरज महारतळे, देवाळकर यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भवादी तथा शेतकरी नेते माजी आमदार ऍड.वामनराव चटप होते. ऍड,वामनराव चटप याप्रसंगी भावुक झालेत.

मनोगत व्यक्त करताना चटप म्हणालेत, की एक सच्चा आणि बिनधास्त विचारांचा परखड कार्यकर्ता हरपला. विदर्भाच्या आंदोलनाची न भरून निघणारी हानी झाली. तसेच शेतकरी संघटनेतील तथा विदर्भाच्या आंदोलनातील त्यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाला पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, राहुल खारकर, देवराव धांडे, संजय चिंचोळकर, मंगेश रासेकर, ऍड सूरज महारतळे, बाळासाहेब राजूरकर, मुसळे, राहुल झट्टे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बालाजी काकडे यांनी केले.

हे पण वाचा

उद्या शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

हे पण वाचा

पालकमंत्री शेतशिवार योजनेअंतर्गत पांदण रस्त्यांचे काम करा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.