ग्रामपंचायत अधिसूचने व्यतिरिक्त दाखल्याची मागणी करू नये
झरी तालुका ग्रामसेवक संगटनेची मागणी
सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रीयेमध्ये उमेदवारांना नामनिर्देश पत्रासोबत आवश्यक कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे. त्यात उमेदवारांना कर थकीत नसल्याचा दाखला, घरी शौचालय असल्याचा दाखला, दोन पेक्षा अधिक अपत्य नसल्याचा दाखला, मक्तेदार नसल्याचा दाखला इत्यादी गरजेचे आहे. तर उर्वरीत दाखल्याकरीता संदर्भीय क्र. 2 शासन निर्णयानुसार उमेदवारांनी स्वतः घोषणापत्र करुन देणे आवश्यक आहे. १३ फेब्रुवारी २०१९ च्या अधीसूचने व्यतिरीक्त दाखल्यांची मागणी करण्यात येवू नये, अशी मागणी तालुका ग्रामसेवक संघटने तर्फे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी तहसिलदार यांना निवेदन सादर केले आहे.
दिनांक १२/०९/२००१ नंतर अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक नसल्याबाबतचे उमेदवाराचे, स्वयंघोषणपत्र’ गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेबाबतचे विहीत नमुन्यातील प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र प्रत./प्रत नसल्यास जात प्रमाणपत्र, समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पोहोच, सदर पोहोचसोबत जात वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर १२ महिन्यांच्या आत सादर करण्याचे हमीपत्र, दैनिक खर्च व एकूण केलेला निवडणूक खर्च विहीत मुदतीत सादर करण्याबाबतचे हमीपत्र. दिनांक २३/१२/२०२० रोजी वयाची २१ वर्षे पूर्ण होत असल्याबाबतचा पुरावा. इत्यादी प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रमाकरीता निवडणूक निर्णय अधीकारी यांना आपल्या स्तरावरुन या बाबत कळविण्यात यावे व १३ फेब्रुवारी २०१९ च्या अधीसुचने व्यतीरीक्त दाखल्यांची मागणी करण्यात येवू नये. अशी मागणी तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय गिलबिले व सचिव गणेश मुके यांनी तहसीलदार जोशी यांना निवेदनातून केली आहे.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: