मुकुटबन येथे संत गाडगेबाबांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

आदर्श शाळेत घेण्यात आला अभिवादन कार्यक्रम

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आदर्श हायस्कूलमध्ये संत गाडगे महाराज स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या बुरसटलेल्या समाजाला किर्तनसारख्या माध्यमातून प्रबोधन करून संत गाडगे महाराजांनी समाजसुधारणेचे अत्यंत लोकोपयोगी कार्य केले. अशिक्षित असूनही अनेकांना शिक्षणाचं मार्ग दाखविला. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी गाडगे बाबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे कर्मचारी चिंतामण पथाडे, सुनील कोल्हे, बाळू आसुटकर ई. उपस्थित होते.

हे देखील वाचा:

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

झरी तालुक्यात कोरोनाचा कहर, टेस्ट करण्याचे आवाहन

Leave A Reply

Your email address will not be published.