धोबी व सुतार समाजाच्या संघटनांचे ओबीसी मोर्चाला समर्थन
3 जानेवारीच्या मोर्चात होणार सहभागी
पुरुषोत्तम नवघरे, वणी: ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी वणीत दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी ओबीसी समाजातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन कऱण्यात आले आहे. या मोर्चाला शनिवारी धोबी समाजाची संघटना तर रविवारी सुतार समाजाच्या संघटनेने पाठिंबा जाहीर केला असून 3 जानेवारीच्या मोर्चात या समाजातर्फे उपस्थिती दर्शवली जाणार आहे.
सध्या 3 जानेवारीच्या मोर्चाबाबत जनजागृती करण्याचे कार्य सुरू आहे. शनिवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी श्रीसंत गाडगेबाबा महाराज स्मारक निळापूर रोड वणी येथे धोबी समाजाची बैठक झाली. या बैठकीत ओबीसींच्या मोर्चाला पाठिंबा देण्याचे ठरले. तर रविवारी दिनांक 27 डिसेंबर शहरातील महादेव मंदिर, सुतार पुरा येथे सुतार समाजाची बैठक झाली. बैठकीतही सर्वानुमते ओबीसींच्या मोर्चाला पाठिंबा देऊन मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे ठरले.
3 जानेवारीला लॉन्ड्री आणि प्रेसचे दुकान राहणार बंद
धोबी समाजाने मोर्चाच्या दिवशी प्रेसचे दुकाने बंद ठेवून मोर्च्यात सहभागी होण्याचा निश्चय केला आहे. यावेळी समाजाचे अध्यक्ष कैलास बोबडे, दिलीप मस्के, प्रदीप मुके, दिपलाल चौधरी, संजय चिंचोळकर, ज्ञानेश्वर भोंगळे, विजय दोडके, श्याम बिहारी, नरेश चौधरी, उमाकांत भोजेकर, राहुल चौधरी, भास्कर पत्रकार, राजू क्षीरसागर, उत्तम पिंपळकर, जनार्दन थेटे, राजू बोबडे, विजय क्षीरसागर, योगेश बोबडे, प्रशांत महाकुलकर, सुरेश थेटे, मंगेश थेटे, सतिश दोडके, राजू मोतेकर, पवन बोबडे व धोबी समाजातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुतार समाजातर्फे जाहीर करण्यात आला पाठिंबा
आज झालेल्या बैठकीत बारा बलुतेदार महासंघाचे वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रवीण खानझोडे, राजू तुरणकर, प्रा.मुळे यांच्या मार्गदर्शनात वणी तालुक्यातील सर्व सुतार समाज बांधवांची बैठक झाली. बैठकीचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम नवघरे यांनी केले. बैठकीत मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय़ घेण्यात आला.
यावेळी मयात्मज विश्वकर्मामय झाडे, अमन बुरडकर, महेश राखुंडे, रत्नताई अंड्रस्कर, नगरसेविका आरती वांढरे, किसनराव दुधलकर, दौलतराव झिलपे, अशोकराव बुरडकर, रमेश बुरडकर, संजय वनकर, विजय जयपूरकर, गोविंदा निवलकर, प्रशांत झिलपे, शैलेश झिलपे, राजेंद्र मुरस्कर, माधवराव द्रुगकर, बाळू गहुकर, शालिकराव दुधलकर, अरुण घोंगे, रितिक झिलपे, रितेश साखरकर, कल्पक अंड्रस्कर, रूपक अड्रस्कर, अक्षय झिलपे, प्रसाद झिलपे, निखिल झिलपे, पूनम झिलपे, लता झिलपे यासह समाज कार्यकारणी पदाधिकारी, युवा मंच व महिला मंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: