ओबीसी मोर्चाला विविध समाजाचा वाढता पाठिंबा
शिंपी, मुस्लिम समाजासह महिला बचत गटाने जाहीर केला पाठिंबा
जब्बार चीनी, वणी: ओबीसी समाजाच्या 3 जानेवारीला निघणा-या मोर्चासाठी विविध समाजातून पाठिंबा वाढत आहे. मंगळवारी मुस्लिम समाज व शिंपी समाजाने मोर्चाला पाठिंबा देत मोर्चामध्ये सहभागी होण्याचे जाहिर केले. याशिवाय शहरातील सर्व महिला बचत गटाने देखील या मोर्चाला पाठिंबा जाहिर केला आहे.
2021 साली होणा-या जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी या मागणीसाठी वणीमध्ये रविवारी दिनांक 3 जानेवारी रोजी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या या मोर्चाबाबत जनजागृती मोहीम राबवली जात आहे. मंगळवारी संध्याकाळी शिंपी समाज भवन वणी येथे शिंपी समाजाची बैठक झाली.
याशिवाय पंडित दिनदयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पौणीमा शिरभाते यांच्या प्रमुख उपस्थितीत वणी शहरातील सर्व महिला बचत गटांची सहविचार सभा संपन्न झाली. यात ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी या मागणीला पाठिंबा जाहीर करण्यात आला. या बैठकीत जातनिहाय कृती समिती वणीचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार, मुख्य समन्वयक मोहन हरडे, प्रवीण खानझोडे, विजय कडूकर यांनी मार्गदर्शन केले.
मुस्लिम समाजातर्फे ओबीसी मोर्चाला पाठिंबा
मुस्लिम समाजातील पिंजारी, रंगरेज, कुरेशी यासह मुस्लिम समुदायातील इतर मागासवर्गीय समाजाद्वारे वणी येथे बैठक घेण्यात आली. यात मुस्लिम समाजातर्फे ओबीसी मोर्चाला पाठिंबा देण्यात आला आहे. या बैठकीला रफिक रंगरेज, आसिफ शेख, रहिम शेख, जावेद शेख, जहिर शेख, इकबाल शेख, यांच्यासह मुस्लिम समाजातील विविध ओबीसी समाजातील व्यक्ती उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाज 3 जानेवारीला आपला व्यवसाय बंद ठेऊन मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
शिंपी समाजाच्या बैठकीचे प्रास्ताविक राम मुडे यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल अक्केवार यांनी केले. कार्यक्रमाला दीपक दिकुंडवार, राकेश दिकुंडवार, संतोष कर्नेवार, संतोष रामगीरवार, पद्माकर मंथनवार, पंकज अक्केवार, विजय गटलेवार, उमेश वऱ्हाडे, अरुण वझलवार यांच्यासह शिंपी समाज बांधव उपस्थित होते.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: