रात्री 2 वाजता त्याने तिला बोलवले विट भट्ट्याच्या मागे…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील वांजरी येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. पीडित व पालकांच्या तक्रारीवरून या प्रकरणी एका 21 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार पीडित मुलगी ही आपल्या आई वडीलांसह वांजरी येथील एका वीट भट्यावर मजुरी करते. 5 दिवसपूर्वी तिची ओळख वीट भट्याच्या मागे खाणीत काम करणाऱ्या उत्तरप्रदेश येथील एका मिराज नावाच्या तरुणासोबत झाली. दि. 27 डिसें. रोजी रात्री आई वडील झोपल्यानंतर रात्री 2 वाजता मिराजने तिला भेटण्यासाठी वीट भट्याजवळ झोपडीच्या मागे बोलावले. ती तिथे गेली असता मिराजने तिला खाण्यासाठी चॉकलेट दिले. तसेच तिचा हात पकडून तू मला आवडते असे म्हणून मिठी मारली.

पहाटे 4.30 वाजता आई वडिलांना मुली घरात दिसत नसल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा झोपडीच्या मागे दोघे आढळून आले. घडलेल्या प्रकरणामुळे घाबरलेली अल्पवयीन मुलीने 28 डिसें रोजी आई वडीलांसह वणी पो.स्टे. गाठून आरोपी मोहम्मद मिराज मोहम्मद युसूफ (वय 21 वर्ष) रा. सल्टूवा, ता. सोनहा, जि. बस्ती उत्तरप्रदेश ह.मु. वांजरी विरुद्द तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी विरुद्द कलम 354(अ) (1) व सहकलम 12 पोक्सो अनव्ये गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास सपोनि माया चाटसे व स.फौ डोमाजी भादीकर करीत आहे.

राजूर येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता….

राजूर (ईजारा) येथील 17 वर्षीय मुलगी दि. 28 डिसें. रोजी सकाळी 10.30 वाजता मैत्रिणीकडे जातो म्हणून घरून निघाली. मात्र सायंकाळ पर्यंत घरी परत आली नाही. कुटुंबीयांनी गावात व परिसरात शोध घेऊनही ती मिळून आली नाही. अखेर मुलीच्या आईने वणी पोलीस ठाणे गाठून अज्ञात इसमाने मुलीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी कलम 363 अनव्ये तक्रार दाखल केली. पुढील तपास सपोनि माया चाटसे व स.फौ. डोमाजी भादिकर करीत आहे.

हे पण वाचा:

एक महिन्याच्या जाहिरातीवर एक महिना फ्री

हे पण वाचा:

शिवसेनेच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हा संघटकपदी हिमांशू बतरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...