निष्क्रिय बांधकाम विभागामुळे नगर विकासाचे 3 कोटी मातीत
निधी खर्च करण्याची मुदत संपली, मुदतवाढीसाठी नगर विकास मंत्र्याना निवेदन
ज्योतिबा पोटे, मारेगाव: शहर विकासाचे नगरपंचायतीला नगर विकास मंत्रालयाकडुन मिळालेल्या तीन कोटी रुपयाचा निधी विहित मुदतीत कामी न लावल्याने निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे बांधकाम विभागाचा निष्क्रियपणा चव्हाट्यावर आला आहे. तो निधी परत न जाता निधीला मुदत वाढवुन मिळण्यासाठी मुंबई येथे नगर विकास मंत्री रणजीत पाटील यांना नगर पंचायत मारेगावच्या वतीने दि. १०आॅक्टोबरला निवेदन सादर केले.
मारेगाव नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर शहर विकासासाठी नगर विकास मंत्रालयाकडून मारेगाव नगर पंचायतला तीन कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. शहर विकासाचे कामे करण्यासाठी बांधकाम विभाग मारेगाव यांना कामे करण्याचे आदेश शासनाने दिले, परंतु दीड वर्ष लोटले तरी बांधकाम विभागाला कामाचा मुहूर्त न मिळाल्याने दिलेला कालावधी संपला.
निधी न वापरल्याने शहर विकासाचे कोणतेच कामे झाली नाही, त्यामुळे जनतेचा रोष नगर पंचायतीवर आहे. यानिमित्ताने बांधकाम विभागाचा निष्क्रियपणाही चव्हाट्यावर आला आहे. म्हणून त्या कामा संदर्भात नगरपंचायत पदाधिकारी जिल्हाधिकार्यांना भेटले, पण बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले अखेर नगर विकासाच्या निधिची मुदत संपली. तो निधी परत न जाव यासाठी मारेगाव नगरपंचायतच्या नगराध्या सह पदाधिकाऱ्यानी मुंबई येथे नगर विकास मंत्री ना.रनजित पाटील यांना निधीची मुदत वाढीसाठी निवेदन सादर केले.
यावेळी वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोतकुलवार, मारेगावच्या नगराध्यक्ष इंदुताई किन्हेकर, नगरपंचायतचे उपाध्यक्ष प्रशांत नांदे, नगरसेविका सुनिता मस्की ह्या उपस्थित होत्या. मारेगाव नगरपंचायतला दोन ते अडीच वर्ष होत असताना शहर विकासाचे कामे मागे पडले असुन उर्वरित अडीच वर्षात शहराचा कायापालट करु असे आश्वासन नगराध्यक्ष किन्हेकार यांनी दिले.