जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन मधील पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर धावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सासुरवाडीत गेलेल्या तलाठ्याच्या मृत्यू प्रकरणी तपासात कसूर केल्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून यवतमाळ येथील अवधुतवाडी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की गुरुनानक नगर यवतमाळ येथील तलाठी विजय गोविंद गाढवे याची 26 जून 2018 रोजी दांडेकर ले आऊट यवतमाळ येथील त्यांच्या सासऱ्याच्या घरी संशयितरित्या मृत्यू झाला. या प्रकरणी प्रथम आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला.
सासरच्या मंडळीने त्याने आत्महत्या केल्याचा दावा केला होता. मात्र मृतक विजय गाढवे याची आई भीमाबाई गाढवे यांनी आपल्या मुलाची आत्महत्या नसून त्याचा सासरच्यांनी खून केल्याचा आरोप केला होता.
त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून न्यायालयाने यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांना या प्रकरणी चौकशी करून संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश चार दिवसांपूर्वी दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअंती अवधूतवाडीचे विद्यमान ठाणेदार आनंद वागतकर, तत्कालीन ठाणेदार व घांटजीचे विद्यमान ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला, अवधूतवाडी ठाण्यातील पीएसआय ज्ञानेश्वर धावडे, एक जमादार तसेच मृत तलाठ्याची पत्नी, सासू, सासरा व साळा यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पीएसआय ज्ञानेश्वर धावडे गेल्या एका वर्षांपासून शिरपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
सदर प्रकरण जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांच्या तपासात असल्यामुळे याबाबत मला जास्त माहिती नाही. पीएसआय धावडे आज तारखेस शिरपूर ठाण्यात कर्तव्यावर आहे.
:सचिन लुले, ठाणेदार, शिरपूर पो.स्टे.
हे देखील वाचा:
आझाद इलेक्ट्राॅनिक्सचा एसी बीग ब्लास्ट सेल AC Big Blast Sale