चिखलगाव येथे दारू तस्करी करताना पोलिसांची धाड

65 हजारांच्या देशी दारूसह सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

विवेक तोटेवार, वणी: शहरालगत असलेल्या चिखलगाव येथून दारू तस्करी करताना पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी पोलिसांना 2 आरोपींना अटक केली असून या कारवाईत देशी दारुच्या पेटीसह सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मंगळवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी रात्री चिखलगाव येथून दारू तस्करीसाठी एक वाहन भरत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रात्री 11 वाजताच्या सुमारास घटनास्थळी जाऊन बघितले असता त्या ठिकाणी एक ओपटेरा मॅगनम वाहनात दारू भरत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी या ठिकाणी धाड मारून देशी दारू ज्याची किंमत 65 हजार, नगदी 18 हजार, एक मालवाहक (MH04 DY 5195) किंमत 5 लाख, एक नॅनो कार (MH 34 AA 6954) किंमत 1 लाख असा एकूण 8 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी धनेश्वर भावनिशंकर जोगी (52) रा. मौर्य नगर चिखलगाव, कुंदन कोकजी चव्हाण (27) रा. शास्त्रीनगर वणी यांना अटक केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या कलम 65 (अ) (इ) 82, 83 नुसार गुन्हा करण्यात आला आहे.

सदर कारवाई दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, पोलीस निरीक्षक वैभव जधाव यांच्या मार्गदर्शनात सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार यांनी केली.

हे देखील वाचा:

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.