बहुगुणीकट्टा: मनातलं सांगायचं त्याला…

बहुगुणीकट्टामध्ये कु. निशा ढवस यांची कविता

0

बहुगुणीकट्टामध्ये आजची कविता आहे कु. निशा ढवस यांची…

मनातलं सांगायचं त्याला …

पहिल्याच नजरेत भरला तो
अन् ह्रदयाचा ठोका चुकला,
मनातील सांगायचं त्याला
पुन्हा जर तो भेटला..

आला नाही दिवस तो
भेट तशीच राहून गेली,
दिवसा मागून दिवस गेले
तळमळ मनाची झाली..

बघता बघता वर्ष गेले
कॉलेजही सुटले,
त्याच्या आठवणींचे ढग
ह्र्दयात दाटले..

कॉलेजच्या वर्दळीत पुन्हा
ओळखीचा चेहरा दिसला,
सरळ येऊन तो
माझ्या बाजूलाच बसला..

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रतीक्षा संपली वेळ ती आली
मनातील सांगणार त्याला,
घट्ट मिठी मारून
तो हसत निघून गेला..

पहिल्यांदा असं घडलं
मनातील सारं कळल त्याला,
अन् राहूनच गेले
मनातलं सांगायचं त्याला ..

– कु. निशा ढवस

वणी बहुगुणी या न्यूज पोर्टलसाठी आर्टिकल, कविता पाठवण्यासाठी, तसंच तुमच्यात असणा-या कलागुणांविषयी माहिती देण्यासाठी

संपर्क : निकेश: 9096133400

Email id: wanibahuguni.news@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.