तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील शिंदोला येथील हनुमाननगर आणि सिमेंट कंपनी वसाहतीत शुक्रवारी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिवमहोत्सव समितीच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संतोष सोनटक्के होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सदस्य संजय निखाडे, विजय झाडे, दत्ता बोबडे, रुपलता निखाडे, अनिल तेलंग, कल्पना टोंगे, ज्योती उईके, अनिल गारघाटे, ज्योती बोधाने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लेझीम पथकासह गावातून शोभायात्रा काढण्यात आली. जिजाऊंची वेशभूषा सुप्रिया मासिरकर, शिवाजी महाराजांची हेमंत पांगुळ, तान्हाजींची सुरेश कोडापे तर मावळ्यांची वेशभूषा ओम पोलजवार, आकाश मेश्राम, सर्वेश बानकर यांनी केली होती. शोभायात्रा संपताच शिवव्याख्याते रामचंद्र सालेकर यांचे व्याख्यान पार पडले. व्याख्यानातून शिवाजी महाराजांच्या विविध जीवन पैलूंवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन रवींद्र पांगुळ यांनी केले. आभार राजेंद्र गोरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष पंकज झाडे, उपाध्यक्ष दीपक पिदूरकर, सचिव निलेश गोरे आणि सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
हे देखील वाचा: