विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील राजूर इजारा येथील तरुनी घरी न सांगता निघून गेली आहे. निघून घेल्याचे समजताच तरुणीच्या आईने वणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील राजूर इजारा येथे राहणारी 17 वर्षीय तरुणी ही वणीतील एका कापड दुकानात काम करते. शुक्रवारी 12 मार्च रोजी ती नेहमीप्रमाणे घरून कामासाठी निघून गेली. त्या दिवशी रात्रीपर्यत ती घरी परतले नाही. आईवडिलांनी संबंधितांना विचारणा केली. परंतु मुलीचा थांगपत्ता लागला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीच्या आईने वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. वणी पोलिसात कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील प्राथमिक तपास प्रभाकर कांबळे तर मुख्य तपस पोऊनी बाजड करीत आहे.
हे देखील वाचा: