जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहविक्री व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेला न्यायालयाने 2 वर्षांचा सश्रम कारावास आणि 2 हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे. महिलेचे नाव शेख परवीन शेख मेहबूब (35), रा. पटवारी कॉलोनी वणी, ह.मु. विजयवाडा (तेलंगणा) असे आहे. वणी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन यवतमाळ कारागृहात रवानगी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वणी पोलिसांनी दि. 12 ऑक्टोबर 2017 रोजी जत्रा मैदान परिसरातील रेडलाईट क्षेत्रात धाड टाकली. त्यात आरोपी महिलेला अल्पवयीन मुलीसह काही तरुणी कडून बळजबरीने देहविक्री व्यवसाय करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. वणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल अप.क्र. 1153/2017 नुसार तत्कालीन PSI संगीता हेलोंडे यांनी गुन्ह्याची तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.
तब्बल साडे तीन वर्षानंतर प्रथम श्रेणी न्यायालय वणीचे न्यायदंडाधिकारी के.के. चाफले यांनी 16 मार्च 2021 रोजी आरोपी महिलेला अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) कायदा 1956 (पिटा) अनव्ये 2 वर्ष सश्रम कारागृह आणि 2 हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 3 महिने अधिकचे कारावास आरोपीला भोगावे लागणार आहे.
सदर प्रकरणात सरकारी वकील म्हणून ऍड.एस.पी. वानखेडे यांनी बाजू मांडली तर पैरवी अधिकारी म्हणून पोउका अशोक टेकाडे यांनी कर्तव्य बजावले.
हे देखील वाचा: