नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे राहणा-या एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर काकडे (26) रा. गोंडबुरांडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो पीडित महिलेला पाठलाग करायचा. तसेच मोबाईल नंबरसाठी त्रास देऊन शरीरसुखाची मागणी करायचा.
प्राप्त माहिती समीर काकडे (26) हा गोंडबुरांडा येथील रहिवाशी आहे. त्याचा गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. पीडीत विवाहित महिला ही नोकरी करीत असून मारेगाव येथे प्रभाग क्र.13 मध्ये किरायाने राहते. पीडितेचे आई वडील व नातेवाईक हे 2 वर्षापूर्वी आरोपी समीर काकडे यांची कार भाड्याने करून बाहेर फिरायला गेले होते. त्यामुळे आरोपीची पीडितेशी ओळख होती. गेल्या 2 महिन्या पासून आरोपी समीर हा पीडितेवर वाईट नजर ठेवून नेहमी पाठलाग करत होता.
दरम्यान एक दिवस कोलगाव येथील जिल्हा परिषद शाळे जवळ आरोपीने पीडित महिलेला आडवे होऊन मोबाईल नंबर मागितला व शरीर सुखाची मागणी केली. मोबाईल नंबर न दिल्यास पाहून घेईल अशी धमकीही दिली. मात्र पीडितेने मोबाईल नंबर देण्यास नकार दिला. त्यावर आरोपीने चिडून अश्लील वाईट शिवीगाळ केली.
या प्रकाराने पीडिता घाबरली. पीडित महिलेने आपल्या सोबत घडलेली सर्व हकीकत आपल्या वडील व भावाला सांगितली. कुटुंबातील व्यक्तीने पीडितला सोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठले व आरोपी समीर काकडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मारेगाव पोलिसांनी कलम 354 (A), 354 (D), 294, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास पो.नि. जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करत आहे.
हे देखील वाचा:
डीपी दुरुस्त करण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचा-यांस जबर मारहाण