अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या 7 जणांना अटक

शिरपूर पोलिसांची सणावारांच्या पार्श्वभूमीवर मोहीम

0

जितेंद्र कोठारी, वणी: दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या होणारी दारु तस्करीविरुद्द शिरपूर पोलिसांनी गुरुवारी धडक कारवाई करीत 7 जणांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी दारुसह 2 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे. आगामी सणावारांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीला लागूनच दारूबंदी जिल्हा असलेल्या चंद्रपूरची सीमा आहे. या भागातूनच दारुची तस्करी केली जाते. सध्या होळी, रंगपंचमी व शिवजयंती निमित्त पोलिसांची नाकाबंदी व पेट्रोलिंग सुरु आहे. दरम्यान वणी-घुग्गुस-चंद्रपूर महामार्गावर दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या 5 दुचाकी वाहनांवर कारवाई करुन 7 आरोपींना अटक करण्यात आले.

पहिल्या कार्यवाहीत आकाश गाडगे (21) रा. जुनोनी, ता. झरी या आरोपीकडून विदेशी मद्य साठा व हिरोहोंडा मोटरसायकल असे एकूण 73 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी प्रफुल ठोंबरे (19) व अमित येरगुडे (20) रा. तुकुम, जि. चंद्रपूर कडून मोपेड व विदेशी दारु किंमत 55 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल मिळाला. तिसऱ्या कार्यवाहीत आरोपी त्रिलेश राहुलवार ( 20) व विपुल उपरे (21) रा. चंद्रपूर यांच्याकडून विदेशी दारु व हिरोहोंडा मोटरसायकल असा 74 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी योगेश ढोले (36) रा. पळसगाव, जि चंद्रपूर कडून देशी दारु व दुचाकी असे 52 हजार 340 रुपये, तर आरोपी घनश्याम पावडे (33) रा. कोरटी जि. चंद्रपूर कडून देशी दारु किंमत 1560 रुपये, असे एकूण 2 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि सचिन लुले, पोउपनी कांडुरे, नापोकां घोडाम, दिवेकर, पाटील, सुरपाम पोलीस शिपाई गजू सावसाकडे होमगार्ड सागर वाढई यांनी पार पाडली.

हे देखील वाचा:

वेळाबाई येथे विजेच्या खांबावरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मुकुटबन येथील धाब्यावर दारूची अवैधरित्या विक्री

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.