नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढता कहर बघता,आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवाल नुसार मारेगाव शहरात आज पुन्हा कोरोनाचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 19 वर पोहचली आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील लहान मोठ्या सर्व व्यावसायिकांना व त्यांच्या कामगारांना प्रशासनाने कोरोना टेस्ट करणे बंधनकारक केले आहे.त्यामुळे शहरातील व्यवसायिकांनी कोरोना टेस्ट केली असता आरोग्य विभागाला काल रात्री मिळालेल्या अहवाल नुसार शहरातील 2 पुरुष पॉझिटिव्ह आढळले आहे. हे दोघेही व्यवसाय क्षेत्राशी जुळलेले असल्याची माहिती आहे.
आता ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 19 वर पोहचली असून यापैकी 4 पॉझिटिव्ह खाजगी कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहे तर मारेगाव येथील कोविड सेंटर वर उपचार घेवून बरे झालेल्या 10 रुग्णांना आज सुटी मिळणार आहे, तर 5 पॉझिटिव्ह उपचार घेत आहे.
हे देखील वाचा:
वेळाबाई येथे विजेच्या खांबावरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू