जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात 45 वर्ष व त्यापुढील सर्व नागरिकांना 1 एप्रिल पासून कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी आवर्जून लस घ्यावी, असे आव्हान प्रशासनाने केले आहे. जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा हेतूने वणी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात दोन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. लसीकरण साठी येणाऱ्या नागरिकांनी फक्त आपले आधार कार्ड सोबत आणावे. दोन केंद्र सुरू केल्यामुळे नागरिकांना आता लसीकरणासाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही, असे प्रशासनाने कळविले आहे.
तसेच वाढत्या कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर सर्व व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेणे करणे अनिवार्य करण्यात आले आहे. श्रीराम मंदिर खाती चौक येथे सुरु कोरोना चाचणी केंद्रात व्यापाऱ्यांनी मोफत कोरोना टेस्ट करून घ्यावी. असेही आव्हान प्रशासनाने केले आहे. व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी न केल्यास दंडात्मक कारवाईला समोर जावे लागेल. असा इशाराही देण्यात आला आहे.
व्यापा-यांनी चाचणी करून सहकार्य करावे: संदीप माकोडे
मागील काही दिवसांपासून वणी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे मोफत चाचणी व लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना आव्हान करण्यात येते की त्यांनी न चुकता लसीकरण करून घ्यावा. सर्व प्रकारच्या दुकानदारांना कोरोना चाचणी करून प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. चाचणी न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
संदीप माकोडे : मुख्याधिकारी न.प. वणी
हे देखील वाचा: