विजेच्या लपंडावाने झरी तालुक्यातील जनतेत रोष

कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे विजेवर चालणाऱ्या उपकरणाला धोका

0
सुशील ओझा, झरी: उन्हाळा सुरू होताच जनतेला  उन्हाची गर्मी व चटके जाणवायला सुरवात झाली आहे. उन्हाच्या गर्मी सुरू असतानाच लाईन जाणे व त्यात डबल गर्मी जाणवणे लोकांच्या जीवावर उठले आहे. तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून विजेच्या लपंडवाने तसेच कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने जनता त्रस्त झाली असून वीज वितरण कंपनी विरुद्ध मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केल्या जात आहे.
   तालुक्यात शेतकरी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून लाईनच्या भरवश्यावर ८० टक्के लोक शेती करतात. उन्हाळ्याचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी भुईमूग,मुंग,ज्वारी,मका व भाजीपाला लावला आहे. परंतु विजेच्या लपडवाने शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. कमी दाबाच्या पुरवठयामुळे  बोअरची मोटर उठत नाही त्यामुळे उभ्या पिकाला पाणी देने कठीण झाले आहे ज्यामुळे शेकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांचे मोटर जळून मोठा आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे. 
कमी दाबाच्या विद्युत पुरवठा मुळे विजेवर चालणारे उपकरणे खराब होण्याच्या मार्गावर आहे. विजेच्या भरवश्यावर चालणारे लहान व्यावसायिक बंद होण्याच्या मार्गावर आहे. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावातील पाणीपुरवठया पिठगिरणी वर मोठा परिणाम झाला आहे. झरी इथे सर्व शासकीय कार्यालय असून गोरगरीबापासून तर सार्वनाच ऑनलाईनची कामे तसेच शासकीय कामे लाईन नसल्याने तसेच कमी दाबाच्या पुरवठया मुळे खोळमबले आहे. लाईन राहत नसल्याने गोरगरिबांच्या कामाला मोठी अडचण निर्माण होत आहे.
तालुक्यात १०६ गावे असून पाटण, मुकुटबन,झरी,अडेगाव व हिवरा बारसा इथे सबस्टेशन असून संपूर्ण तालुक्यात वीज पुरवठा केला जातो. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन तालुक्याचा वीज पुरवठा सुरळीत करून वीज पुरवठा करावा आधी मागणी होत आहे.

 

हे देखील वाचा: 

खळबळजनक: डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला

रविवारी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.