शासकीय रुग्णालय व डोलोमाईट कंपनीला किशोर तिवारी यांची भेट
झरी व मुकुटबनच्या रुग्णालयात डॉक्टर व उपकरणांचा तुटवडा
सुशील ओझा, झरी: स्व. वसंतराव स्वावलंबी शेती मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा झरी तालुक्याचा दौरा केला. यात त्यांनी शासकीय रुग्णालय तसेच परिसरातील डोलोमाईट कंपनीला भेट दिली. याशिवाय “माझे कुटुंब, माझी जवाबदारी” या कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील लोकांना मास्क लावण्याचे, तसचे काळजी घेण्याचे आवाहन केले.
अडेगाव शिवारात असलेली जगती माईंनिंगबाबत कवळी व स्थानिक लोकांनी तक्रार केली. यात त्यांनी स्थानिकांना रोजगार देत नसून बाहेर राज्यातील लोकांना कामावर ठेवत असल्याचा आरोप केला. तसेच कंपनीतील धुरामुळे गावकऱ्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागत असल्याची तक्रार गावकर-यांनी किशोर तिवारी यांच्याकडे केली. त्यावरून किशोर तिवारी यांनी जगती माईंनीगला भेट दिली व कंपनीच्या व्यवस्थापनाला धारेवर धरले व गावातील 50 टक्के तरुणांना रोजगार देण्याची तसेच गावातील लग्न समारंभाला मदत करा अशी सूचना केली.
अडेगाववरून किशोर तिवारी यांनी मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली व संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयात औषधी, ओपीडी व कोरोना रुग्णांच्या तपासण्या बाबत कर्मचारी डॉक्टर बाबत माहिती घेतली व त्या सबंधी सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात भेट दिली व ऑपरेशन रूम, पेशंटचे जनरल रूम, औषधी साठा, ओपीडी, रक्त तपासणी कक्षाची पाहणी केली.
मुकुटबन व झरी येथील रुग्णालयातील डिलेव्हरी झालेल्या महिलांचे आकडे डॉक्टर यांना विचारले असता त्यांचे आकडे खोटे असून घरी झालेल्या डिलेव्हरी महिलांचे आकडे दवाखान्यात झाल्याचे दाखविले असल्याचे तिवारी यांनी ठणकावून सांगितले. व कागदावर फक्त आकडे दाखवून सर्वांना रेफर केल्या जाते व काही औषधी बाबत माहिती घेतली असता ते सुद्धा दवाखान्यात उपलब्ध नसल्याचे आढळून आले.
एक वर्षांपासून एक्सरे मशीन बंद असून अजूनपर्यंत उपलब्ध झाली नसल्याने रुग्णांना पांढरकवडा वणी व यवतमाळ सारख्या ठिकाणी जावे लागते हे सर्व बघून तिवारी संतापले व दोन्ही दवाखान्यातील कारभार उघडकीस आला. तसेच दोन्ही दवाखान्यात कर्मचारी डॉक्टर कमी असल्यामुळेही मोठा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.
तिवारी यांच्या सोबत तहसीलदार गिरीश जोशी नायब तहसिलदार रामचंद्र खिरेकर तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम गटविकास अधिकारी मुंडकर मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने पाटणचे ठाणेदार संगीता हेलोंडे शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल ,सीताराम पिंगे व इतर कर्मचारी होते.
हे देखील वाचा:
धक्कादायक: क्वॉरन्टाईन सेन्टरमधून 5 कोरोना पॉजिटिव्हनी काढला पळ