धक्कादायक: क्वॉरन्टाईन सेन्टरमधून 5 कोरोना पॉजिटिव्हनी काढला पळ

आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन पुन्हा चव्हाट्यावर

0

जितेंद्र कोठारी, वणी: कोविड पॉजिटिव्ह आढळलेले पुनवट येथील 5 रुग्णांनी येथील कोविड केअर सेंटरमधून पळ काढल्याचे धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडला. या घटनेमुळे वणी येथील आरोग्य विभागाचे कोरोना बाबत ढिसाळ नियोजन एकदा पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.  पळून गेलेल्या रुग्णांना शोधण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. कोरोना रुग्ण पळल्याबाबत पोलीसांना माहिती देण्यात आली. मात्र काही वेळाने पाचही रुग्ण स्वतःहुन परत आल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

       

अधिक माहितीनुसार तालुक्यातील पुनवट येथे 2 एप्रिल रोजी आयोजित शिबिरात नागरिकांची RTPCR चाचणी करण्यात आली. दि. 6 एप्रिल रोजी आलेल्या अहवालात पुनवट येथील 14 व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह निघाले. नियमानुसार पोजिटिव्ह आलेल्या रुग्णांना तात्काळ एम्बुलेन्सद्वारे कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याची गरज होती. मात्र आरोग्य विभागाकडे वाहन उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांना स्वतःहुन वणी येण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुनवट येथील 14 व्यक्तीपैकी 5 जणं मिळेल त्या वाहनाने वणी कोविड सेंटर येथे पोहचले. सदर पाचही व्यक्तींना कोविड केंद्रात आईसोलेट करण्याची प्रक्रिया सुरु असताना सदर पाचही जणांनी कोविड केंद्राच्या गेटच्या बाहेरून पळ काढला.

        

याबाबत वणी बहुगुणी प्रतिनिधींनी तालुका वैधकीय अधिकारी डॉ. विकास कांबळे याना विचारणा केली असता त्यांनी पोजिटिव्ह व्यक्ती परत केंद्रात आल्याचे सांगितले. तसेच त्या पाचही व्यक्तीसह पुनवट येथील सर्व 14 पोजिटिव्ह व्यक्तीना गावातच होम आईसोलेट करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे कोविड केंद्रातून पोजिटिव्ह रुग्ण पळून गेल्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना माहितीच दिली नाही.

       

आरोग्य विभागातर्फे कोरोना चाचणी आणि लसीकरण मोहीम चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. मात्र चाचणी अहवाल येण्यास विलंब होत आहे. त्यामुळे संशयित व्यक्तींपासून इतर लोकांना कोरोना प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

वणी बहुगुणी हे देखील वाचा:

कोरोना विस्फोट: आज तालुक्यात कोरोनाचे एकूण 70 रुग्ण

दारु दुकाने ‘लॉक’, तळीरामांना ‘शॉक’

 

Leave A Reply

Your email address will not be published.