जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 8 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 29 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 12 तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 185 झाली आहे. आज यवतमाळहून एकही अहवाल प्राप्त न झाल्याने ही रुग्णांची आजची संख्या कमी आहे.
शहरामध्ये प्रगती नगर येथे 2 रुग्ण तर बेलदारपुरा, रंगनाथ नगर, गुरुनगर, रामपुरा, नारायण निवास, जैन ले आउट, शासकीय रुग्णालय जवळ, गांधी चौक, आंबेडकर चौक, शास्त्री नगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात राजूर कॉलरी येथे 5 रुग्ण व शिंदोला, गणेशपूर येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळून आलेत. याशिवाय नांदेपेरा, पळसोनी, भालर कॉलरी, कोना, सुंदर नगर, सोनापूर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. तर मारेगाव तालुक्यातील मांगरुळ व बोटोणी येथील प्रत्येकी 1 रुग्ण पॉजिटिव्ह आला आहे.
आज यवतमाळ येथून एकही अहवाल प्राप्त झाले नाही. आज 101 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 23 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 72 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 245 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 864 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 4 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली
सध्या तालुक्यात 185 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 59 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 91 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 35 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1683 रुग्ण आढळून आलेत. यातील 1472 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
वणी बहुगुणी हे देखील वाचा:
धक्कादायक: क्वॉरन्टाईन सेन्टरमधून 5 कोरोना पॉजिटिव्हनी काढला पळ