जब्बार चीनी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याची अद्याप कोणतेही चिन्ह नाहीत. आज शनिवारी दिनांक 17 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 47 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 16 रुग्ण तर ग्रामीण भागातील 29 रुग्ण आहेत. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 2 रुग्ण वणी येथे पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. याशिवाय आज वणी येथील एका 57 वर्षीय महिलेचा व झरी येथील एका 49 वर्षीय व्यक्तीचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 379 झाली आहे. आजची दिलासादायक घटना म्हणेज आज तब्बल 54 पॉजिटिव्ह व्यक्ती कोरोनामुक्त झालेत.
आज आलेल्या शहरातील 16 रुग्णांमध्ये गोरक्षण, आंबेडकर चौक व विठ्ठलवाडी येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर सुभाषचंद्र बोस चौक, गायकवाड फैल, सानेगुरुजी नगर, ढुमे नगर, रेल्वे कॉर्टर, भोंगळे ले आऊट, आंबेडकर चौक, हिराणी ले आउट, तेली फैल, गुरुवर्य कॉलनी, पंचवटी अपार्टमेन्ट येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला.
ग्रामीण भागात मोहदा क्रेशर येथे 5 रुग्ण, गणेशपूर येथे 4 रुग्ण राजूर कॉलरी येथे 3 तर दुनकी, नवीन वागदरा, चिखलगाव येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळून आलेत. याशिवाय मोहदा, नांदेपेरा, निवली, वांजरी, पिंपरी कायर, मंदर, रासा, पुनवट, भांदेवाडा, घोन्सा, डोंगरगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
आज यवतमाळ येथून 264 अहवाल प्राप्त झाले. यात 43 जण पॉजिटिव्ह आलेत. तर आज 133 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 35 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 442 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 710 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 22 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली
सध्या तालुक्यात 379 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 58 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 274 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 47 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 2105 रुग्ण आढळून आलेत. यातील 1697 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 29 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
वणी बहुगुणी हे देखील वाचा:
45 लाखांच्या दरोड्यातील सूत्रधाराला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी