45 लाखांच्या लूटमार प्रकरणी आणखी एक आरोपी गजाआड

मास्टरमाईंड बाबूलालला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप

0

जितेंद्र कोठारी, वणी: 45 लाखांच्या दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पुखराज चौधरी असे या संशयीताचे नाव असून त्याला वणीतील मुकुटबन रोडवरील मारोती टाउनशिप येथून अटक केली. त्याच्यावर मास्टरमाइंड बाबूलाल बिश्नोईला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

पोलीस कोठडी दरम्यान मुख्य आरोपी बाबूलाल बिश्नोईकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पुखराज चौधरी याला मुकुटबन रोडवरील मारोती टाउनशिप येथून अटक केली. अटक करण्यात आलेला पुखराज चौधरी हासुद्धा मूळ राजस्थानचा आहे. आरोपी मागील 12 वर्षांपासून वणी येथे वास्तयव्यास असून कापड व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 मार्च रोजी दरोड्याच्या घटनेनंतर बाबूलाल बिश्नोई यांने पुखराज चौधरी यांच्या घरी आश्रय घेतला. त्यानंतर पुखराजने भाड्याच्या वाहनातून बाबूलालला वाशिम पर्यंत पोहचविण्यास मदत केली. पोलिसांनी आरोपी विरुद्द कलम 216 (अ) अनव्ये गुन्हा दाखल केले आहे. दरोड्याचा घटनेत सहभागी इतर चार ते पाच आरोपी अजून फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार करीत आहे.

वणी बहुगुणी हे देखील वाचा:

कोरोनाचा प्रकोप सुरूच, आज 47 पॉझिटिव्ह

45 लाखांच्या दरोड्यातील सूत्रधाराला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

Leave A Reply

Your email address will not be published.