झरी तालुक्यातील आठ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई
विहीर व बोअर अधिग्रहण करिता वरिष्ठांकडे प्रस्ताव
सुशील ओझा, झरी: उन्हाळा चांगलाच तापू लागला आहे तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली त्यामुळे तालुक्यातील 7 गावांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता शासन व प्रशासन हतबल झाले आहे. त्याकरिता शासनाकडून वेगवेगळे उपाययोजना करीत शासन त्रस्त झाले आहे. सोशल डिस्टनसिंगचे पालन करता व जनजागृती करताच वेळ मिळत नसल्याने पाणीटंचाई वरील आढावा बैठक घेण्यात आली नाही.
तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा तालुक्यातील सर्व ग्रामसेकाकडून गटविकास अधिकारी मुंडकर यांच्याकडून घेण्यात आला. त्यात तालुक्यातील 7 गावांना पाण्याची तीव्र पाणी टंचाई होत असल्याची माहिती मिळाली आहे. निंबादेवी, मांडवी, दिग्रस, हिवरा बारसा, झमकोला,हिरापूर व उमरी ही गावे पाणी टंचाईग्रस्त असून मांडवा गावकरीता टँकरने पाणी पुरवठा होण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
वरील टंचाग्रस्त गावकरीता विहीर व बोअर अधिग्रहण करण्या करिता प्रस्ताव एसडीएम यांच्याकडे करण्यात आले असून प्रस्ताव मंजूर होताच विहीर व बोअर द्वारे वरील गावात पाणी पुरवठा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुर्भा व दाभा (डोर्ली) येथे गावातील ग्रामपंचायतच्या विहिरी मध्ये आडवे बोअर मारून पाण्याचा स्रोत वाढवून गावकर्यांकरिता पाण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे.
काही गावातील ग्रामपंचायत मध्ये 14 वित्त आयोगाच्या फंडाचा उपयोग करुन बोअर मारून मोटर बसवून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर काही गावात 14 वित्त आयोगातील पैसा शिल्लक नसल्याने अडचण निर्माण होत आहे. मांडवा गावात पाण्याकरिता बोअर मारूनसुद्धा बोअरला पाणी लागत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. सोमवार पर्यंत वरीष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविलेले प्रस्ताव मंजूर होताच पाणीटंचाई ग्रस्त गावाना टँकरने पाणीपुरवठा होणार आहे.
कोरोनाच्या नियमामुळे 25 लोकांच्या वर मिटिंग मध्ये बसता येत नसल्याने प्रस्तावित आढावा मिटिंग सुद्धा रद्द करण्यात आली. परंतु जिल्हा कार्यालय ,लोकप्रतिनिधी,जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून पाणीटंचाई बाबत आढाव घेत असल्याची माहिती गटविकास अधिकारी मुंडकर यांनी दिली आहे.
तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावातील पाण्याच गंभीर प्रश्न सोडविण्याच्या प्रयन्त सुरू आहे. मी व पाणीपुरवठा अभियंता याकडे विशेष प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच जी गावे टंचाईग्रस्त आहे परंतु जिल्हा टंचाईग्रस्त यादी मध्ये नाव नाही अश्या ग्रामपंचायतने ठराव घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठवावे ते टंचाईग्रस्त गाव घोषित होताच त्या गावनासुद्धा पाणीपुरवठा करीत मदत करता येईल असे आवाहन सुद्धा गटविकास अधिकारी मुंडकर यांनी केले.
हे देखील वाचा: