जब्बार चीनी, वणी: आज शहरात विनाकारण फिरणा-यांची भर चौकात कोरोना टेस्ट करण्याची मोहीम राबवण्यात आली. ही विशेष मोहीम टिळक चौकात राबवण्यात आली. यात 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. या पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना होम आयसोलेट करण्यात आले आहे. ही कारवाई आणखी काही दिवस राबवली जाणार आहे.
विनाकारण फिरू नये अशी वारंवार सूचना आणि आवाहन करूनही यात कोणताही बदल होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने आता यावर उपाय म्हणून अनोखी शक्कल लढवली आहे. जी व्यक्ती विनाकारण फिरत आहे अशा व्यक्तींची कोरोनाची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट केली जात आहे. आजपासून या कारवाईला सुरुवात झाली आहे. आज शहरातील टिळक चौकात दुपारी 11 वाजता या कारवाईला सुरुवात झाली. यावेळी 29 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. यात 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे.
दुपारी 12.30 वाजेपर्यंत सदर कारवाई चालली. मात्र टिळक चौकात कारवाई सुरू असल्याची माहिती मिळताच लोकांनी त्या रस्त्या वाहतुकीसाठी वापरणे बंद केले. अखेर ही कारवाई आजच्या पुरती स्थगित करण्यात आली. यापुढे आकस्मित रित्या शहरात कुठेही आणि कोणत्याही वेळी ही कारवाई करण्यात येईल. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन ना. तहसिलदार विवेक पांडे यांनी केले आहे.
राज्यात कोरोनाना कहर सुरू आहे. सध्या अनेक लक्षणं नसलेले पॉझिटिव्ह व्यक्तींचा शहरात मुक्त वावर सुरू आहे. या व्यक्तींना काहीही होत नाही मात्र अशा व्यक्ती मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार करीत आहे. त्यामुळे ब्रेक दे चेन या मोहीमे अंतर्गत सध्या राज्यभरात अशा प्रकारची कारवाई केली जात आहे. सदर कारवाईत ठाणेदार वैभव जाधव, ना. तहसिलदार विवेक पांडे, अशोक ब्राह्मणवाडे, पोउनि गोपाल जाधव यांच्यासह आरोग्य, महसूल, पोलीस विभागाचे कर्मचारी सहभागी होते.
हे देखील वाचा: