ज्योतिबा पोटे, वणी: मारेगाव तालुक्यातील खापरी शिवारात शेतातील बांधावर बांधुन असलेल्या गाय व वासरू वीज कोसळून ठार झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी पाच वाजताचे सुमारास घडली. यात शेतक-याचं सुमारे 12 हजारांचं नुकसान झालं आहे.
खापरी शिवारात विठ्ठल शेंडे रा.नवरगाव (धरण) यांचे मालकीचे शेत असून त्यांचेच मालकीचे गाय व वासरु शेताच्या बांधावर बांधुन होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ढगाळ वातावरण होऊन विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. याच वेळी वीज पडुन बांधावर असलेले गाय व वासरु (अंदाजे किंमत बारा हजार रुपये,) जागीच ठार झाले.
शेतकऱ्याना या नैसर्गिक आपत्तीतून वाचविण्यासाठी शासन काय उपाय योजना करणार याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे. शासन एकीकडे शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देत नाही, त्यामुळे शेतकऱ्याचा शासनावरचा विश्वास उडाला आहे. परिसरात फवारणीमुळे होणारे शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू आणि नैसर्गीक संकटांमुळे होणारी जीवित व वित्तहाणीमुळे शेतकरी व शेतमजुरांंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.