वणीत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपचे निदर्शने

बंगाल येथील हिंचाचाराविरोधात आंदोलन

0

जितेंद्र कोठारी, वणी: विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला आहे. पश्चिम बंगाल भाजपच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्यात येत आहे. या राजकिय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवार 5 मे रोजी वणी येथील आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे जनसंपर्क कार्यालयासमोर निदर्शने, आंदोलन केले.

पश्चिम बंगाल हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बुधवारी सकाळी भाजप कार्यालयासमोर जमले. कोरोना व लॉकडाउन नियमांचे पालन करीत त्यांनी ममता बनर्जी व तृणमूल कॉंग्रेस यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.  तसेच काळे झेंडे फडकवून लोकशाहीची गळचेप होत असल्याचाही आरोप केला.

निषेध आंदोलनात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जिल्हा महामंत्री रवि बेलुरकर, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, दिनकरराव पावडे , गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, नितीन वासेकर, संदीप बेसरकर, अवि आवारी, दिपक पाऊनकर, शुभम गोरे, बालाजी भेदोडकर, वैभव मेहता, अक्षय देठे यांच्यासह वणी तालुका आणि शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा:

सावंगीच्या सभामंडपाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे 

मराठा आरक्षणाबाबत अपेक्षीत निकालच लागला: डॉ. अशोक जिवतोडे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.