झरीमध्ये अस्वच्छतेने गाठला कळस, जागोजागी कच-याचे साम्राज्य
मुख्यधिकारी यांचे दुर्लक्ष, रहिवाशांमध्ये संताप
सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायत अंतर्गत शहरात व परिसरात संपूर्ण घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नगरपंचायत बाबत जनतेत ग्रामवासीयांत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. झरी नगरपंचायत अंतर्गत 17 वॉर्ड असून 17 नगरसेवक आहे तर सुमारे 1800 लोकसंख्या आहे. यातील अनेक वॉर्डात घाणीचे सम्राज्य झाले आहे. घाणीमुळे ग्रामवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून झरी शहरात व वॉर्डातील साफसफाई व कचरा गाडी बंद झाली आहे. बसस्टँड, शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे जमा झाले आहे. तर झरी येथील मुख्यमार्गावरील नाली प्लास्टिक, काडी कचरा व प्लास्टिक बॉटलने तुडुंब भरल्या आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर कचरा सडून घाण सुटली आहे.
पाण्याचे डपके, सडलेला कचरा वाहणाऱ्या पाण्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. झरी येथील नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्या कडे वणी नगरपरिषदचेचा प्रभार दिल्यामुळे झरी नगरपंचायत कडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप स्थानिक करीत आहे. नगरपंचायत कार्यालयात ही साफसफाई नसल्याने याकडे कोण लक्ष देणार असाही संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही समस्या तात्काळ सोडवावी अशी अपेक्षा झरीतील रहिवाशी व्यक्त करीत आहे.
हे देखील वाचा: