विवेक पिदूरकर, शिरपूर: आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरपूर येथे रविवारी भेट दिली. सोबतच पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे आणि जिल्हा आरोग्य समिती सदस्य बंडु चांदेकर यांची उपस्थिती होती. कोरोनाविषयी माहितीमध्ये बाधित रुग्णाची संख्या, कोरोणा लसीकरनाची संख्या, विविध विषयावर माहितीचा आढावा घेण्यात आला. आशा स्वयसेविका यांचे मानधन व इतर मानधन नियमित करण्याच्या सूचना डॉ प्रवीण बोडखे यांना देण्यात आल्या.
शिरपूरचे वैद्यकीय अधिकारी तथा ‘मॅग्मो’चे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ अभिनय कोहळे यांनी तालुक्यातील कर्मचाऱ्याच्या रिक्त पदांची भरतीची मागणी केली. तसेच तालुक्यात २४ समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांचे पदापैकी २१ पदे रिक्त असल्याची माहिती देताच आमदार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दूरध्वनी वरून संपर्क साधून तात्काळ पदभरती करण्या करीता सांगितले.
तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ कोहळे यांनी शिरपूर येथे वाचनालयाची मागणी करताच लवकरच त्यासाठी लागणारी योग्य ती मदत करण्या येईल अशी ग्वाही आमदारांनी दिली. येणाऱ्या काळात आरोग्य च्या पदभरती व इतर विविध स्पर्धा परीक्षा करीता त्याची गावातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.
एकंदरीत प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरपूर येथील सर्व आरोग्य विषयी माहितीचा आढावा घेतला असता अधिकारी आणि कर्मचारी यांचे कामा विषयी समाधान व्यक्त केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण बोडखे, HA मारोती पंधरे, LHV रोशनी बागडे, MPW प्रवीण अस्वले, तसेच गावातील उपसरपंच मोहित चचडा, ग्राम पंचायत सदस्य महेश वाढीवा, गणेश डाहुले, संदीप घागी यांची उपस्थिती होती.
हे देखील वाचा: