राजेंद्र करमनकर यांचे निधन

आंबेडकरी चळवळीतील सच्चा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आंबेडकरी चळवळीतील सच्चा कार्यकर्ता, सेवानिवृत्त कर्मचारी तथा वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र करमनकर यांचे उपचारादरम्यान यवतमाळ येथे आज सकाळी 9.30 वाजता निधन झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

राजेंद्र करमनकर हे पंचायत समिती मारेगाव येथे वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असताना चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांना सामाजिक क्षेत्रात पूर्वीपासून आवड असल्याने ते नेहमी सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे.

सेवा निवृत्त झाल्यापासून आपला वेळ सामाजिक कामात घालवत होते.आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने त्यांची नुकतीच वंचित बहुजन बहुजन आघाडीच्या मारेगाव शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

दरम्यान ते 10/15 दिवसांपूर्वी आजाारी होते. यवतमाळ वरून उपचार करून बरे होवून ते घरी परत आले होते. दरम्यान त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना 3 दिवसापूर्वी यवतमाळ येथे हलविण्यात आले.मात्र आज 10 में रोजी सकाळी 9.30 वाजता दरम्यान त्यांचे निधन झाले.त्यांचे मागे पत्नी,दोन मुली मोठा आप्त परिवार आहे. आंबेडकरी चळवळीतील सच्चा कार्यकर्ते काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेदेखील वाचा

गंगाधरराव बोर्डे यांचे निधन

हेदेखील वाचा.

पहिल्याच दिवशी 100 पेक्षा अधिकांवर कारवाईचा बडगा

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.