जब्बार चीनी, वणी: सलग तिस-या दिवशी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या अधिक आली आहे. आज सोमवारी दिनांक 10 मे रोजी तालुक्यात तब्बल 131 रुग्णांनी कोरोनावर मात दिली. तर तालुक्यात कोरोनाचे 96 रुग्ण आढळलेत. यातील वणी शहरात 31 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 60 पॉझिटिव्ह आढळून आलेत. तर 5 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. सध्या तालुक्यात 840 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे हजाराच्या वर गेलेली ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 840 झाली आहे. दरम्यान आज यवतमाळ येथे वणी तालुक्यातील 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शासकीय महाविद्यालय येथे वणी येथील एका वणी येथील 60 वर्षीय पुरुषाचा तर खासगी रुग्णालयात वणी येथील एक 79 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
वणी शहरात आलेल्या 31 रुग्णांमध्ये रवीनगर, गुरुनगर व जि. प. कॉलनीमध्ये प्रत्येकी 4 रुग्ण, बॅंक कॉलोनी, मनीष नगर, रंगनाथ नगर, ओल्ड कॉटन मार्केट, गायकवाड़ फेल, मालीपुरा येथे प्रत्येकि 2 रुग्ण तर पटवारी कॉलोनी, सतीघाट, गणपती अपार्टमेंट, ढुमे नगर, काजीपुरा, बुध्दविहार, काळे ले आऊट, विठ्ठलवाडी, प्रगतीनगर, वासेकर ले आऊट येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळलं.
तर ग्रामीण भागांत आलेल्या 60 रुग्णांमध्ये राजूर येथे सर्वाधिक 9 रुग्ण, मोहुर्ली येथे 7, बोर्डा येथे 5 रुग्ण आढळलेत. घोन्सा, चिखलगाव, शेलू येथे प्रत्येकी 3 रुग्ण, सावर्ला, नवरगाव, नांदेपेरा, शिंदोला, वारगाव, शिवणी, मंगलम पार्क गणेशपूर येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर वागदार, नायगाव, चनाखा, कृष्णानपूर, कोना, भालर, मेघदूत कॉलनी चिखलगाव, वांजरी, पुरड, कुंभारखनी, पद्मावती नगरी लालगुडा, पिंपळगाव, सोनापूर, ब्राह्मणी, पठारपूर, मंदर कायर, कुंभारखनी (मोहुर्ली) येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
आज यवतमाळ येथून 397 अहवाल प्राप्त झालेत. यात 53 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 438 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 43 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 543 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 733 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 840 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 62 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 718 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 60 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 4411 रुग्ण आढळून आलेत. यातील 3502 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 69 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा: