दिलासादायक: तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने घट

आज 70 पॉझिटिव्ह तर 113 रुग्णांची कोरोनावर मात

0

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 11 मे रोजी तालुक्यात कोरोनाचे 70 रुग्ण आढळलेत तर 113 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 28 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 40 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 2 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. सध्या तालुक्यात 794 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 4 दिवसांमध्ये सुमारे सव्वा पाचशे पेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान यवतमाळ येथे उपचारादरम्यान तालुक्यातील 2 रुग्णांचा मृत्यू झाला. यात वणी येथील 73 वर्षीय पुरुषाचा शासकीय महाविद्यालय तर एका 52 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

वणी शहरात आलेल्या 28 रुग्णांमध्ये टागोर चौक जवळ 3 रुग्ण तर भीम नगर, पटवारी कॉलनी, माळीपुरा, गुरूनगर येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर विराणी हॉल, सत्यसेवा हॉस्पिटल, कोंडावार ले आऊट, जत्रा रोड, मनिष नगर, सुभाषचंद्र बोस चौक, भगतसिंग चौक, पहाडपुरा, एकतानगर, विठ्ठलवाडी, संत रविदास नगर, वसंत गंगा विहार, रविनगर, वासेकर ले आऊट, नांदेपेरा रोड, जैन ले आऊट व झेडपी कॉलनी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

तर ग्रामीण भागांत आलेल्या 40 रुग्णांमध्ये नवरगाव येथे सर्वाधिक 5 रुग्ण तर सदाशीव नगर चिखलगाव, भालर, घोन्सा, लालगुडा येथे प्रत्येकी 3 रुग्ण आढळलेत. गणेशपूर, रासा, बोरी येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर ढाकोरी, सोनापूर, वागदारा, मुर्धोनी, पिंपरी, राजूर, कुंभारखनी, शिरपूर, मंदर, वडगाव, कोना, मोहुर्ली, सोनेगाव, पुनवट, वारगाव व साखरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर झरी व मारेगाव तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण वणी येथे पॉझिटिव्ह आला आहे.

आज यवतमाळ येथून 353 अहवाल प्राप्त झालेत. यात 48 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 277 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 22 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 561 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 959 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 794 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 89 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 649 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 56 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 4481 रुग्ण आढळून आलेत. यातील 3615 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 72 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.

हे देखील वाचा:

पुरड (पुनवट) जवळ दुचाकीचा भीषण अपघात

अबब…! कपड्याच्या दुकानात भरली होती ग्राहकांची जत्रा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.