पुरड (पुनवट) जवळ दुचाकीचा भीषण अपघात

संध्याकाळी कामावरून परत येताना तरुणावर काळाचा घाला

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी ते घुगूस मार्गावर पुरड (पुनवट) जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सोमवारी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान उपारासाठी दाखल करताना दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

प्रदीप मारोती नागपुरे (29) हा शिरपूर येथील रहिवाशी होता. तो गवंडी काम करून उदरनिर्वाह करायचा. प्रदीप हा काल पुनवट वरून गवंडी काम करून संध्याकाळी शिरपूरला त्याच्या दुचाकीने (MH29 B2310) परत येत होता. दरम्यान 7 वाजताच्या सुमारास त्याला एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रदीपला चंद्रपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी तपास केला असता ट्रॅक्टर (MH29 AK 0026) ने धडक दिल्याचे समोर आले. सदर ट्रॅक्टर हे पुरड येथील एका विटभट्यावरचे असल्याची माहिती आहे. 

प्रदीपचा उपचारादरम्यान मृत्यू
प्रदीपला संध्याकाळी उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला डॉक्टरांनी नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. रात्री 12 वाजताच्या सुमारास प्रदीपला नागपूर येथे हलवण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. प्रदीप हा विवाहित होता. त्याच्या मागे आई वडील पत्नी व 1 वर्षाची मुलगी आहे. प्रदीपच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे शिरपूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

अबब…! कपड्याच्या दुकानात भरली होती ग्राहकांची जत्रा

ज्येष्ठ पत्रकार अण्णाजी कचाटे यांचे निधन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!