शुल्लक कारणावरून वाद, एकमेकांवर लोखंडी सळई व विटेने हल्ला

वणीतील पंचशील नगर येथील घटना, दोघे जखमी

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील पंचशील नगर येथे राहणाऱ्या दोन शेजाऱ्यात आज मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान जागेच्या कारणावरून भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की त्यांनी एकमेकांवर लोखंडी रॉड आणि विटने हल्ला केला. या भांडणात दोघे जखमी झाले तर दोघांना किरकोळ मार लागला आहे. या प्रकरणी दोन्ही कुटुंबातर्फे वणी पोलिसात एकमेकांविरुद्ध तक्रार दिली.

सविस्तर वृत्त असे की, नागेश गुज्जलवार (38) हा पंचशील नगर येथे राहतो. त्यांच्या घराच्या शेजारी निखिल राजू कर्णेवार (31) राहतो. यांच्यात अनेक दिवसांपासून शुल्लक वाद व्हायचे. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान नागेशचे निखिल सोबत जागेवर कंपाउंड का केले यावरून वाद झाला. हे भांडण इतके विकोपाला गेले की निखिल याने शिविगाळ करत नागेशची पत्नी सुलभा गुज्जलवार व नागेशची नंदयी गौतम मारोती वैरागडे, नणंद सरिता यांना लोखंडी सळईने मारहाण केली. यात हे तिघेही जखमी झाले. 

तर निखिल याच्या तक्रारीनुसार भांडण सुरू असताना नागेशचा मुलगा चेतनने निखिल याच्या डोक्यावर विट फेकून मारली. अचानक विट मारल्याने तो खाली पडला. त्यानंतर चेतनने निखिलला विटेने मारहाण केली. या झटापटीत निखिलचे डोके फुटले.

या प्रकऱणी परस्पर तक्रार दाखल कऱण्यात आली. पोलिसांनी सुलभा यांच्या तक्रारीवरून निखिल राजू कर्णेवार याच्यावर भादंविच्या कलम 324 व 504 नुसार गुन्हा दाखल केला. तर निखिल याच्या तक्रारीवरून नागेशचा मुलगा चेतन याच्यावर देखील 324 व 504 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल बुर्रेवार करीत आहे.

हे देखील वाचा:

दिलासादायक: तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने घट

पुरड (पुनवट) जवळ दुचाकीचा भीषण अपघात

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.