मारेगाव तालक्यात आज 9 पॉझिटिव्ह, तर 40 कोरोनामुक्त

उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू, तालुक्यात 373 ऍक्टिव्ह रुग्ण

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 16 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळले. तर 40 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. 

Podar School 2025

आज आरोग्य विभागाने 468 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात केवळ 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तसेच आज 387 व्यक्तींचे आरटीपीसीआर टेस्ट केली,  त्याचे नमुने यवतमाळ येथे तपासणी करीता पाठवण्यात आले आहे. तसेच आज तालुक्यातील दोघांचा कोरोना मुळे मृत्यू झाला. यात खडकी (बु) येथील 50 वर्षीय पुरुष, तर गोंडबुरांडा येथील 45 वार्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तालुक्यात सध्या 373 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंट वर 13 रुग्ण उपचार घेत आहे तर उर्वरित होम आयसोलेट आहे. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यात एकीकडे रुग्णांची संख्या कमी होत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळत आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.