कौटुंबिक वादातून आपसात भिडले सगेसोयरे, दोघे जखमी

राजूर (कॉलरी) येथील घटना

0

जितेंद्र कोठारी, वणी: सोयरीक जोडण्याचा वादावरून दोन कुटुंबात मारहाण झाली. या झटापटीत शस्त्राने वार झाल्याने 1 व्यक्ती तर भांडण सोडवण्यास मध्ये पडलेला 1 व्यक्ती जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 8 वाजता दरम्यान राजूर येथे घडली. याबाबत एका पक्षाने दाखल केलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

      

प्राप्त माहितीनुसार राजूर गावातील बोरगरवार कुटुंबातील मुलीचे घराशेजारी राहणारे अलवरवार परिवाराच्या मुलासोबत लग्न झाले. अलवरवार यांचा मुलगा दिव्यांग असल्याची माहिती असताना मुलीने त्याच्यासोबत लग्न केले.  मात्र लग्नांनंतर मुलगी नांदायला तयार नसल्याने दोन्ही कुटुंबात वाद सुरु होते.

शुक्रवारी रात्री 7 वाजता दरम्यान याच विषयावरून वाद सुरु असताना मारोती भानय्या अलवरवार यांनी शंकर अलय्या बोरगरवार यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यामुळे शंकर बोरगरवार यांच्या उजव्या डोळाच्या बाजूने वार लागून जखमी झाला. दोघांमधील वाद सोडविण्यासाठी गेलेला राजू बोरगरवार यांच्यावरही आरोपी मारोती यांनी वार केला. त्यामुळे राजू बोरगरवार यांचा कानाला चिरा लागून जखमी झाला.

टनेबाबत फिर्यादी शंकर बोरगरवार रा. राजूर (कॉ.) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा वणी पो.स्टे. येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मारोती भानय्या अलवरवार (52), रा. बिरसामुंडा चौक, राजूर (कॉलरी) विरुद्द कलम 326 भादवी अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांचे मार्गदर्शनात सहा.उपनिरीक्षक जगदीश बोरनारे करीत आहे.

हे देखील वाचा:

सुविधा कापड केंद्रावर आज पुन्हा धाड

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.