राजूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र येथे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

बँकेचा ठिकाणी जर नियमांचे पालन होत नसेल, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार?

0

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दुष्परिणाम रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत वेळेचं बंधन साधत लॉकडाऊन लावले. कोरोना रोखण्यासाठी शारीरिक अंतर ठेवणे अती महत्त्वाचे आहे. गर्दी करणे कोरोना वाढण्यास मदत करते, या करिताच शारीरिक अंतराला महत्त्व आहे.

Podar School 2025

त्या अनुषंगानेच गर्दी न करणे व गर्दी टाळणे हे लॉकडाऊनचे महत्वाचे नियम आहेत. जनता किंवा कुठल्याही आस्थापणात गर्दी करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. परंतु ह्या नियमांचा विसर राजूर कॉलरी येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये दिसून येतो. त्या ठिकाणी गर्दीही होते व शारीरिक अंतराला किंमत न देता पूर्णपणे सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडतो.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्याठिकाणी कुठेही नियमाचे उल्लंघन झाले म्हणून कुणावर कारवाई होताना दिसत नाही. राजूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून ह्या ठिकाणीसुद्धा सोशल डिस्टनसिंग नाहीच. शेतीच्या पीक कर्जसाठी ह्या दिवसांमध्ये शेतकरी बँकेत अर्ज करण्यासाठी येतात.

बँकेकडून कर्ज देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी बोलावले जाते. यात ज्येष्ठ नागरिकांना बोलावून त्यांना उन्हात लाईनमध्ये उभे ठेवले जाते. आधीच बँकेत नेहमीची गर्दी आणि त्यासोबत शेतकऱ्यांची वेगळी गर्दी, त्यामुळे प्रचंड मोठ्या रांगा अशी परिस्थिती!

ह्या गर्दीला टाळण्यासाठी येथील बँक ऑफ महाराष्ट्र विशेष कुठलीही कृती करताना दिसत नाही. ह्या बँकेत अल्प कर्मचारी असल्याने मोठ्या संथगतीने येथील व्यवहार चालतो. त्यामुळेच येथील गर्दी कमी होण्याऐवजी गर्दी वाढतच जाते.

एका दिवशी काम होत नसल्याने परत दुसऱ्या दिवशी गर्दीत वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे शारीरिक अंतर किंवा सोशल डिस्टनसिंग ला काहीच किंमत उरत नाही आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र असो की बँक असो ही शासकीय, निमशासकीय कार्यालये किंवा आस्थापने गर्दीला कमी करण्याऐवजी गर्दीला वाढवीत आहेत.

गर्दी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. गर्दी कोरोनाच्या प्रसाराचे माध्यम आहे हे ठाऊक असताना जर बँकेचे कर्मचारी व अधिकारीच ह्याकडे दुर्लक्ष करीत असतील तर सामान्य जनतेला दोष देण्यात काहीच अर्थ नसल्याचे नागरिक म्हणत आहेत.

वेळीच ह्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून विशेष उपाययोजना करावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी येथील सुज्ञ नागरिकांची मागणी आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

मीदेखील वणीमध्ये शिक्षण घेतले- माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

Leave A Reply

Your email address will not be published.