नागेश रायपुरे, मारेगाव: आज 24 में रोजी तालुक्यात अवघे 3 पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात 2 पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तर दुसरीकडे 35 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज आरोग्य विभागाने 153 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यात 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. आज आलेल्या रुग्णांवरून 181 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणी करिता पाठवण्यात आले आहे. अद्याप आरटीपीसीआरचे 803 रिपोर्ट पेंडिंग आहे.
तालुक्यात सध्या 166 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंटरवर 29 रुग्ण उपचार घेत आहे तर 113 रुग्ण होम आयसोलेट आहे. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर 8 तर 10 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे.
हे देखील वाचा:
एका लग्नाची ही निराळीच गोष्ट, अनाथ मुलीच्या लग्नात गहिवरले वऱ्हाडी….