वणीत आणखी एका दुकानावर पथकाची कारवाई

50 हजारांचा दंड

0

विवेक तोटेवार, वणी: आज मंगळवारी दिनांक 25 मे रोजी प्रशासनाच्या कारवाई पथकाने शहरातील एका जनरल स्टोअर्सवर कारवाई केली. कडक लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा व दुकाने व्यतिरिक्त इतर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नाही. अशा अस्थापनावर प्रशासनाने कारवाई करणे सुरू केले आहे.

आज सकाळी प्रशासनाला जैन स्थानक जवळील आयलमल आसुमल (एव्हीएस मार्केटिंग) नावाचे जनरल स्टोअर्स आहे. हे दुकान सुरू असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यावरून प्रशासनाने त्या दुकानावर धाड टाकली असता या दुकानात मास्कसह इतर वस्तूंचीही विक्री होत असल्याचे पथकास निदर्शनास आले. त्यावरून पथकाने कारवाई करत सदर दुकान सील केले.

एव्हीएस मार्केटिंग या दुकानाचे संचालक नंदू लालवाणी यांच्यावर 50 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. दंड न भरल्यास प्रशासनातर्फे गुन्हा दाखल केला जणार असल्याची माहिती आहे.

सदर कारवाई प्रभारी मुख्याधिकारी रविंद्र कापसीकर, खुशाल भोंगळे, उत्तम हापसे, धम्मरत्न पाटील यांनी केली. आतापर्यंत वणीत तीन कापड केंद्र, एक बार, दोन भंगार व्यवसायिक, एक मोबाईल शॉपी व एका फोटो स्टुडिओवर कारवाई केली आहे.

हे देखील वाचा:

जेव्हा तिच्या सायकलीला अचानक बिबट्या क्रॉस करतो…

अल्पवयीन मुलीला सारखे मॅसेज करणे पडले महागात

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.