वणीचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांची बदली

बाळासाहेब खाडे वणीचे नवीन ठाणेदार

0

रवि ढुमणे, गिरीश कुबडे वणी: वणी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्हा अंतर्गत बदलीची चर्चा सुरु होती. वणी ठाण्यासाठी कोण बाजी मारतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी रात्री यासंदर्भातील आदेश आले आणि मुंबईहुन नागपूर , नंतर यवतमाळात आलेल्या बाळासाहेब खाडे यांची वणी ठाणेदार पदी नियुक्ती करण्यात आली. तर वणीचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांना यवतमाळ येथे नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी पोलीस ठाण्यात आजपर्यत एक वर्षाहून अधिक काळ कोणी काढला नाही. मात्र गेल्या दोन वर्षापूर्वी वणी ठाण्यात बदलून आलेले मुकुंद कुळकर्णी यांनी वणी परिसरात अत्यंत कुशल आणि बंधुभाव जोपासत शहरात वचक बसविला. ठाण्यात विविध समाजाच्या बैठका घेऊन सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केली.

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न करीत सामान्य माणसाला जवळ करून त्याच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी बाळगली. प्रत्येक घटकसोबत मैत्रीपूर्ण संबंध जोपासले. अखेर त्यांची बदली यवतमाळ येथील नियंत्रण कक्षात झाली आहे. आता त्यांच्या जागी वडगाव ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांची नियुक्ती झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.